नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक मुंबई- आग्रा महामार्गावर आज व्हिटिसी फाट्याजवळ बस व ट्रकचा अपघात झाला. या घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले. सकाळी साडेआठ वाजत ही घटना घडली. मुंबईकडून नाशिककडे जाणारी ट्रक व नाशिककडून इगतपुरी कडे जाणारी महामंडळाच्या बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात ट्रक चालक व बस चालक, क्लिनर सह पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले.
या अपघातात ट्रक क्रं MH 15.DK.3116 व बस क्रं.MH.40.AQ.6010 यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दयाराम निवृत्ती सहाने (४५) राहणार पाथर्डी फाटा बस चालक, तेजस निवृत्ती पगार (४२) रा. नाशिक बस कंडक्टर,डॉ. संजय देवराम सदावर्ते (५१), रा. घोटी ग्रामीण, मोहन रामराव वाकचौरे (४४) रा. शिवाजीनगर सातपूर, कुंदन वसंतराव पाटील (३१) राहणार नाशिक, प्रतिमा दिघे व ट्रक चालकाचे शैलेश हे गंभीर जखमी झाले आहे.
या अपघाताची माहिती फोनवर मिळताच गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत अॅम्बुलन्स लगेचच अपघात स्थळी पोहोचली व त्या जखमींना तात्काळ नाशिक सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल केले.