इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्र प्रदर्शनीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आमदार देवयानी फरांदे यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्र प्रदर्शनी तयार करण्यात आलेली आहे. या प्रदर्शनीच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनाचा विविध पैलू नागरिकांच्या समोर मांडण्यात आलेला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व, चित्रांच्या माध्यमातून त्यांचे जीवन व व्यक्तिमत्त्वा नागरिकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न या प्रदर्शनीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. प्रसाद मंगल कार्यालय नाशिक या ठिकाणी ही प्रदर्शनी लावलेली होती. या प्रदर्शनीचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी बावनकुळे यांच्या समवेत सरचिटणीस विक्रांत पाटील, आमदार प्रा. देवयानी फरांदे, भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव, उपाध्यक्ष सुनील फरांदे मध्य विधानसभेचे निवडणूक प्रमुखअनिल भालेराव आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन हे समाजातील सर्व घटकांसाठी आदर्शवत असल्याचे सांगून एक चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होतो. हा देशाच्या लोकशाहीचा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीचा विजय आहे. असे गौरव उद्गार त्यांनी काढले.
पंतप्रधान मोदी यांचे जीवन एका सागराप्रमाणे आहे प्रत्येक वेळेस त्यांचा नवीन गुण समोर येतो. असे नमूद करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर चित्र प्रदर्शनी केल्याबद्दल त्यांनी आमदार देवयानी फरांदे व भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर यांचे अभिनंदन केले. आगामी काळात ही प्रदर्शनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.