नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात निवडणुक लढवण्याच्या ते तयारी होते. दरम्यान माजी खासदार भानुदास वाकचौरे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना संपर्क प्रमुखपदावरुन हटवल्यामुळे ते नाराज होते.
या राजीनाम्यानंतर घोलप यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, मी अद्याप उपनेतेपदाचा राजीनामा दिला असला तरी अद्याप शिवसेनेत आहे. पण, एकदोन दिवसात कार्यकर्त्यांशी चर्चा करुन आपण निर्णय घेऊ असे सांगितले. त्यामुळे ते ठाकरे गटाची साथ सोडतात की आपली नाराजी उध्दव ठाकरे यांना सांगतात याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
बबन घोलप हे शिवसेनेचे जेष्ठ नेते आहे. त्यांनी मंत्रीपदही भूषविले आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतरही त्यांनी ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात खासदार हेमंत गोडसे सह शिंदे गटात अनेकांनी प्रवेश केला. पण, घोलप यांनी ठाकरे गटातच राहणे पसंत केले.
Babanrao Gholap resigned from the post of deputy leader