नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक दौ-यावर उपमुख्यमंत्री अजित पवार असतांना त्यांना वणीमध्ये शेतकऱ्यांनी दाखवले काळे झेंडे दाखवले. यावेळी शेतक-यांनी रस्त्यावर टोमॅटो आणि कांदे फेकून आंदोलनही केले. ताफा अडवण्याचा प्रयत्नही या कार्यकर्त्यांचा होता. पण, हे आंदोलन काळे झेंडे दाखवून व रस्त्यावर टोमॅटो व कांदे फेकून करण्यात आले.
गेल्या काही दिवसापासून कांदा व टोमॅटो आणि कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त आहे. त्यामुळे अजित पवार कळवणकडे जात असताना वणीमध्ये शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड केली.
सकाळी अजित पवार यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. त्यांच्याबरोबर या दौ-यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सुध्दा आहे. सकाळी ओझर विमानतळ येथे त्यांचे आगमन होताच राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व मुंबई अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. त्यानंतर वणीमार्गे कळवण कडे जात असतांना शेतक-यांनी हे आंदोलन केले. आज दिवसभर नाशिक जिल्ह्यात अजित पवार यांचे विविध कार्यक्रम आहे.
शरद पवार गटाने केले आंदोलन
दिंडोरी – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज दिंडोरी दौऱ्यावर असताना त्यांचे दिंडोरी अवनखेड लखमापूर फाटा वणी येथे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले असताना ते वणी सप्तशृंग गडाकडे मार्गस्थ होत असताना वणी कळवण चौफुली वर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष शाम हिरे, विधानसभा अध्यक्ष संतोष रेहरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत कांदा टोमॅटो रस्त्यावर फेकत ताफा अडवण्याचा प्रयत्न करत कांदा व टोमॅटोचे कोसळलेल्या भावा संदर्भात सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत शेतकऱ्यांना ताब्यात घेतले यानंतर अजित पवार यांचा ताफा सप्तशृंग गडाकडे रवाना झाला.
ताफ्यात हे होते नेते
अजित पवार यांचे समवेत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,आमदार दिलीप बनकर आदी सहभागी होते.तत्पूर्वी दिंडोरी येथे बाजार समिती उप सभापती कैलास मवाळ,उपनगराध्यक्ष दीपक जाधव,भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश बर्डे,लताताई बोरस्ते,अनिकेत बोरस्ते आदी कार्यकर्त्यांनी स्वागत करत विविध मागण्यांचे निवेदन दिले.अवंनखेड येथे जगदंबा माता देवस्थान चे भक्त निवासचे भूमिपूजन अजित पवार यांचे हस्ते झाले. यावेळी सरपंच नरेंद्र जाधव व ग्रामस्थांशी पवार यांनी संवाद साधला.
लखमापूरला जेसीबी मधून पुष्पवृष्टी
राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे लखमापूर फाटा येथे सहा जेसीबी मधून पुष्पवृष्टी तसेच क्रेन द्वारे भव्य पुष्पहार घालत भव्य स्वागत करण्यात आले. कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे ,युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र उफाडे, तालुकाध्यक्ष कृष्णा मातेरे, संपत कड, राहुल कावळे, दत्तू गटकळ, नितीन भालेराव,परिक्षीत देशमुख आदी कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.
In Nashik district, angry farmers showed black flags to Deputy Chief Minister Ajit Pawar by throwing onions, tomatoes on the road.