इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक– मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात बससह अन्य तीन वाहनांचा अपघात झाल्याची घटना घडली. रविवारी सायंकाळी हा उपघात झाला असून त्यात ५ जण जखमी झाले आहेत. याअपघातात अगोदर ट्रकला काळी – पिवळी इको गाडीने धडक दिली. त्यानंतर मागून आलेल्या शिवशाही बसने ट्रकला मागून धडक दिली. त्यानंतर बसच्या मागून येणार ट्रेलर ट्रक बसवर आदळला. त्यामुळे शिवशाई बसने पेट घेतला. पण, बस चालकाने ही आग तात्काळ विझवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
या अपघातात दोन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य, महामार्ग सुरक्षा पोलीस, कसारा पोलीस यांनी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मदत केली. या विचित्र अपघातात इको गाडीसह बसचे मोठे नुकसान झाले असून अपघातात पाच जण जखमी झाले.
बसने पेट घेतल्यानंतर बसमधील सर्व प्रवासी तातडीने खाली उतरले त्यानंतर बस चालकाने ही आग विझवली. या अपघातामुळे कसारा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, पोलीसांनी अपघातग्रस्त वाहने तातडीने बाजुला केल्याने वाहतुक सुरळीत केली.