इगतपुरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ट्रिपल सीट असणाऱ्या दुचाकीस्वाराचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हा मुंबई – आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे तिघेही महिंद्र कंपनीचे कामगार असल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघातात दुचाकीवरील समाधान देवराम भगत, सचिन कचरू पथवे, (रा. धार्णोली वैतरणा) हे दोघे जण जागीच ठार झाले. तर भाऊ भगत रा. खंबाळे हे गंभीर जखमी झाला आहे. हे तिघेही नाशिकच्या दिशेने दुचाकीवरुन ट्रिपल सीटजात होते. यावेळी दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी ट्रकवर पाठीमागून जाऊन जोरदार आदळली. त्यात दोघे जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, महामार्ग सुरक्षा पोलीस उपनिरीक्षक हरी राऊत, यांच्यासह पोलिस घटनास्थळी पोहचले. या घटनेनंतर काही काळ वाहतुक ठप्प झाली होती. मात्र पोलीसांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला करून वाहतुक सुरळीत केली.