नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासगी शाळेचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपीक दिगंबर अर्जुन साळवे ५० हजार रुपयाची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे नाशिक शहरातील एका खासगी शाळेत १३ डिसेंबर २०१९ पासून ते ३१ डिसेंबर २०२२ पावेतो शिक्षण सेवक म्हणून नोकरीस होते व त्यानंतर शिपाई या पदासाठी त्यांची मान्यता आल्यानंतर ते दिनांक १ जानेवारी २०२३ पासून ते आज पावतो सदर शाळेत शिपाई या पदावर कार्यरत आहेत. त्यांना अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारे वेतन मिळालेले नाही. सदर वेतन मिळण्यासाठी आवश्यक असलेला शालार्थ क्रमांक मिळण्यासाठी त्यांनी शाळेच्या मार्फतीने शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठवला आहे. सदर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक येथील कनिष्ठ लिपीक साळवे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष ५० हजार रुपयाची लाचेची मागणी करून ती आज १३ सप्टेंबर रोजी पंचासमक्ष नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयात स्वीकारली.
सापळा कारवाई*
*युनिट – नाशिक
*तक्रारदार-* पुरुष
*आलोसे-१) दिगंबर अर्जुन साळवे , कनिष्ठ लिपिक, शिक्षण उप संचालक कार्यालय,
नासिक, वर्ग ३, वय – ५५ वर्षे. रा. टाकळी, भीमशक्ती नगर, नाशिक
*लाचेची मागणी– 50,000/- रुपये दिनांक 08/09/2023
*लाच स्विकारली- 50,000/ – रुपये दिनांक 13/09/2023
*हस्तगत रक्कम-* 50,000/- रुपये
*लाचेचे कारण – यातील तक्रारदार हे नाशिक शहरातील एका खासगी शाळेत दि. 13/12/2019 पासून ते 31/12/2022 पावेतो शिक्षण सेवक म्हणून नोकरीस होते व त्यानंतर शिपाई या पदासाठी त्यांची मान्यता आल्यानंतर ते दिनांक 1/1/2023 पासून ते आज पावतो सदर शाळेत शिपाई या पदावर कार्यरत आहेत. त्यांना अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारे वेतन मिळालेले नाही. सदर वेतन मिळण्यासाठी आवश्यक असलेला शालार्थ क्रमांक मिळण्यासाठी त्यांनी शाळेच्या मार्फतीने शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठवला आहे. सदर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक येथील आलोसे, कनिष्ठ लिपिक यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 50,000/- रुपये लाचेची मागणी करून ती आज दि. 13/9/2023 रोजी पचासमक्ष नासिक शिक्षण उप संचालक कार्यालयात स्वीकारली.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*सापळा अधिकारी – अनिल बडगुजर
पोलिस उप अधीक्षक,
,ला.प्र.वि. नाशिक. मोबा.नं. 8999962057
सापळा पथक
पो.ना, मनोज पाटील
पो.ना दिपक पवार
म पो.अम. शितल सूर्यवंशी
A junior clerk in the Deputy Director of Education’s office was caught in ACB’s net while accepting a bribe of 50,000