नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदवड तालुक्यातील सोग्रस येथील सरपंच भास्कर पुंडलिक गांगुर्डे व उपसरपंच प्रकाश चंद्रभान गांगुर्डे हे ३० हजाराची लाच घेतांना रंगेहाथ लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात सापडले. पाण्याच्या टाकीचे बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या हस्तांतरण पत्रावर सरपंच या नात्याने सही करून ते पाठवण्यासाठी सरपंच व उपसरपंच यांनी ५० हजाराची लाच मागितली व तडजोडी अंती ३० हजाराची स्विकारतांना ते एसीबीच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंध विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्या मित्राने जिल्हा परिषद अंतर्गत मौजे सोग्रस येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले होते. मात्र सदर बांधकामाचे बिल अद्याप अप्राप्त होते. सदर बिल काढण्यासाठी तक्रारदार यांना अधिकारपत्र प्राप्त होते. सदर पाण्याच्या टाकीचे बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या हस्तांतरण पत्रावर सरपंच भास्कर पुंडलिक गांगुर्डे यांनी सही करून पाठवण्यासाठी ईलोसे सरपंच व उपसरपंच प्रकाश चंद्रभान गांगुर्डे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपयाची लाचेची मागणी करून तडजोडी अंती ३० हजार रुपयाची लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून ती पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
यशस्वी सापळा कारवाई
*युनिट – नाशिक
*तक्रारदार- पुरुष,वय-20
*ईलोसे-
1) भास्कर पुंडलिक गांगुर्डे वय 55 वर्ष धंदा शेती व सरपंच, सोग्रस, रा. सोग्रस, तालुका-चांदवड, जिल्हा नाशिक.
2) प्रकाश चंद्रभान गांगुर्डे वय 45 वर्ष,धंदा शेती व उपसरपंच- सोग्रस,रा. सोग्रस, तालुका-चांदवड, जिल्हा- नाशिक.
*लाचेची मागणी- 50,000/- रुपये तडजोडी अंती 30,000/- रूपये स्वीकारण्याचे मान्य केले.
*लाच स्विकारली- 30,000/ रुपये
*हस्तगत रक्कम- 30,000/-रुपये
- लाचेचे कारण
यातील तक्रारदार यांच्या मित्राने जिल्हा परिषद अंतर्गत मौजे सोग्रस येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले होते. मात्र सदर बांधकामाचे बिल अद्याप अप्राप्त होते. सदर बिल काढण्यासाठी तक्रारदार यांना अधिकारपत्र प्राप्त होते. सदर पाण्याच्या टाकीचे बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या हस्तांतरण पत्रावर सरपंच या नात्याने ईलोसे क्र १ यांनी सही करून पाठवण्यासाठी ईलोसे क्र १ व २ यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 50,000/- रु ची लाचेची मागणी करून तडजोडी अंती 30,000/- रु ची लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून ती पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
सापळा अधिकारी – अनिल बडगुजर, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक
*सापळा पथक – पो.ना. दिपक पवार, पो.शि. संजय ठाकरे