नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – व्यवसायकर रद्द करून देण्याच्या बदल्यात व्यवसाय कर अधिकारी स्नेहल सुनील ठाकुर (५२) यांना ४ हजार रुपयांची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्यांनी पाच हजाराची मागणी होती. पण, चार हजार रुपयाची लाच घेतांना ते एसीबीच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने माहिती देतांना सांगितले की, यातील तक्रारदार यांनी त्यांचे कल्पदीप इंडस्ट्रियल सेक्यूरिटी सर्विसेस ही कंपनी दोन वर्षा पासून बंद असल्याने तिचा व्यवसायकर रद्द व्हावा यासाठी १३ सप्टेंबर रोजी व्यवसाय कर अधिकारी यांचे कार्यालयात अर्ज केला होता. सदर व्यवसायकर रद्द करून द्यायचे बदल्यात यातील लोक सेविका स्नेहल ठाकुर यांनी तक्रारदार यांचे कडे पंचा समक्ष लाचेची मागणी करून ती पंचा समक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे
*यशस्वी सापळा कारवाई
*युनिट – नाशिक
*तक्रारदार- पुरुष
*आलोसे- स्नेहल सुनिल ठाकुर वय 52 वर्ष पद -व्यवसाय कर अधिकारी
,व्यवसाय कर अधिकारी यांचे कार्यालय ,कृषि औद्यागिक संघ ली .इमारत क्र. 3, व्दारका, नाशिक
पत्ता :- ग्रँड आश्विन हॉटेल जवळ ,ASM 26/26 आश्विन संकुल रो हाऊस नंबर 4आश्विन नगर नाशिक
*लाचेची मागणी रक्कम व दिनांक :- रुपये 5000/-
दिनांक 20/09/ 2023
*लाच स्वीकारली रक्कम व दिनांक- रुपये 4000/-
दिनांक- 20/09/2023
*लाचेचे कारण – यातील तक्रार दार यांनी त्यांचे कल्पदीप इंडस्ट्रियल सेक्यूरिटी सर्विसेस ही कंपनी दोन वर्षा पासुन बंद असल्याने तिचा व्यवसायकर रद्द व्हावा यासाठी दि 13/09/2023 रोजी व्यवसाय कर अधिकारी यांचे कार्यालयात अर्ज केला होता .सदर व्यवसायकर रद्द करून द्यायचे बदल्यात यातील लोक सेविका स्नेहल ठाकुर यांनी तक्रारदार यांचे कडे पंचा समक्ष लाचेची मागणी करून ती पंचा समक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे
**आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी
मा .राज्यकर आयुक्त, वस्तु व सेवाकर भवन ,माझगाव ,मुंबई , महाराष्ट्र राज्य मुंबई
*सापळा अधिकारी*
विश्वजीत पांडुरंग जाधव पोलीस उप अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
मो.न. 9823388829
सापळा पथक–
पो.ह .प्रकाश डोंगरे
पो. ना. प्रणय इंगळे
म पो शि शितल सूर्यवंशी
चा ल क पो ह संतोष गांगुर्डे
सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक .
Business tax officer caught in SB’s net while accepting bribe of Rs four thosand