इंडिया दर्पण वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी अवैध उत्खनन विरुद्ध याचिका अॅड. लक्ष्यवेध ओढेकर यांच्यामार्फत पुणे येथे राष्ट्रीय हरित लवाद मध्ये दाखल केली. विना परवाना सर्रास सुरू असलेले बांधकाम याची गंभीर दखल घेत, लवादने याचिका दाखल करून घेतली, या प्रकरणामधील मधील सगळ्या प्रतिवादींना नोटीस काढल्याची माहिती अॅड. इंद्रायणी पटणी, ललिता शिंदे यांनी दिली.
त्याचबरोबर जिल्हाधिकारी नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली, मुख्य अधिकारी, त्र्यंबकेश्वर नगर पालिका, जिल्हाधिकारी नाशिक आणि मुख्य वनसंरक्षक नाशिक यांची समिती स्थापन केली आहे, व समितीला स्थळ पाहणी करून सविस्तर अहवाल मागवला आहे.
वर्षभरापूर्वी नाशकातील ब्रह्मगिरी डोंगर उत्खननप्रकरणी मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर राज्य शासनाने याची दखल घेतली. पण, त्यानंतरही ब्रम्हगिरीचा प्रश्न कायम आहे. आता हरित लवादाने याची गंभीर दखल घेतली आहे.