नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भाजीपाला विक्रीसाठी बसण्याच्या वादातून दोघांनी युवतीस मारहाण करीत विनयभंग केल्याची घटना पाथर्डी फाटा भागात घडली. याप्रकरणी दोघा भाजीपाला विक्रेत्यांविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पप्पू (२०) आणि किरण (२२) अशी संशयितांची नावे आहेत. पीडिता व संशयित भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. पीडित तरूणी सोमवारी (दि.२०) सायंकाळी पाथर्डी फाटा परिसरातील म्हाडा बिल्डींग समोर भरणा-या भाजीबाजारात आपले दुकान मांडत असतांना ही घटना घडली.
बसण्याच्या वादातून तिघा भाजीपाला विक्रेत्यांमध्ये वाद झाला. यावेळी दोघा तरूणांनी पीडितेस मारहाण करीत तिचा विनयभंग केला. या घटनेत पीडितेच्या अंगावरील कपडे फाडण्यात आले असून, अधिक तपास उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten