नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दांम्पत्याने महिलेची फसवणुक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार वर्ष उलटूनही वैद्यकीय साहित्य खरेदीत पुरवठा न केल्याच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली. कर्ज काढून लाखोंची रक्कम अदा केल्याची तक्रार फसवणूक झालेल्या महिलेने केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र दुर्गाप्रसाद मोदी व अनिता राजेंद्र मोदी (रा.दोघे नाशिक) अशी महिलेची फसवणुक करणा-या संशयिातांची नावे आहेत. याप्रकरणी सायली सुनिल चिडे (रा.टागोरनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. चिडे यांचा वैद्यकीय साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. लॅब इन्स्टूमेट खरेदीसाठी त्यांनी १ जानेवारी २०२० मध्ये संशयित पुरवठादार दांम्पत्याशी संपर्क साधला होता. साहित्य खरेदीसाठी चिडे यांनी कर्ज काढले. पुरवठादाराने कर्जासाठी लागणारी कागदपत्र दिले. याकाळात कर्ज मंजूर झाल्याने पुरवठादार दांम्पत्याने चिडे यांचा विश्वास संपादन करून २ लाख ६२ हजार ९७२ रूपये किमतीचे साहित्याचा पुरवठा केला.
यानंतर मात्र कर्जाची ३९ लाख ३२ हजार रूपयांचा बँकेचा धनादेश पदरात पडताच संशयितांनी टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला. चार वर्ष उलटत आलेले असतांना लाखोंची रक्कम अदा करूनही साहित्याचा पुरवठा अथवा पैसे परत न मिळाल्याने चिडे यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गवळी करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten