इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूरमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना नाशिकच्या एका कंपनीने वाहनांचे मायलेज वाढवणारा अनोखा प्रयोग दाखवला. पेट्रोल-डिझेलमध्ये एक विशिष्ट्य वनस्पती तेल ठराविक प्रमाणात टाकले तर मायलेज वाढविण्यास मदत होऊ शकते, असा प्रयोग नाशिकच्या श्रीनिवास इनोव्हेशन्स या कंपनीने गडकरी यांच्यापुढे सादर केला.
१ लिटर पेट्रोलमागे या कंपनीने तयार केलेले वनस्पती तेल २ मिली एवढ्या प्रमाणात टाकले तर पेट्रोलची ज्वलनक्षमता १२ टक्क्यांनी वाढू शकते आणि शिवाय इंधनामुळे होणारे प्रदूषणही ८० टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी करता येऊ शकते, असे या कंपनीचे म्हणणे आहे. गडकरी यांनी हा नाविन्यपूर्ण प्रयोग समजून घेतला.
नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवारी होता. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी नागरिकांनी केली होती. या गर्दीत नाशिकच्या कंपनीने हा प्रयोग दाखवला. यावेळेस गडकरींनी सुध्दा तो समजून घेतला. हा प्रयोग नेमका काय आहे. ते वनस्पती तेल कोणते याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही. पण, हा प्रयोग यशस्वी झाला तर वाहनांना त्याचा फायदा होईल व नाशिकचे नावही उंचावेल….
A mileage-increasing experiment