इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : मुंबई नगरीत सर्व काही विकल्या जाते असे म्हटले जाते, परंतु याचा अर्थ वस्तू विक्री संदर्भात आहे. मात्र मानवी जिवाची तस्करी ! तीही अगदी नवजात बालकांची विक्री होत असल्याचा अत्यंत भयानक धक्कादाय प्रकार उघडकीस झाल्याने मोठीच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे एका छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये नर्सिंग होमची दुकानदारी सुरू करून हा गैरप्रकार सुरू होता.
आता याप्रकरणात बोगस तथा अनधिकृत नर्सिंग होमच्या माध्यमातून बालकांची विक्री करणाऱ्या बोगस डॉक्टर व एजंटसह पाच महिलांच्या टोळीचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे याच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ज्युलीया फर्नांडिस विरोधातील हा सातवा गुन्हा आहे. नर्सिंग होममध्ये येणाऱ्या गरीब व गरजू महिलांना शोध घेत असत. त्यांना पैशाची आम्हीच दाखवून जाळ्यात ओढण्यात येत होती पैशांचे आमिष देत त्यांच्या नवजात बालकांची ७ ते १० लाखांत विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती कारवाईतून उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या वर्षभरात जवळपास ५२ प्रसूती या नर्सिंग होममध्ये झाल्या. तपासात हे नर्सिंग होमही अनधिकृतपणे थाटल्याचे स्पष्ट झाले. तपासात नर्सिंग होमचे कनेक्शन उघडकीस येताच शिवाजी नगर येथील रेहमानी नर्सिंग होमच्या मदतीने या रॅकेटची मास्टरमाइंड ज्युलिया लॉरेन्स फर्नांडिस ही रॅकेट चालवत असल्याचे निष्पन्न झाले.
Shocking type of nursing home in Mumbai…