इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या कथित अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ५० लाख रुपयाची खंडणी मागितल्याची तक्रार तक्रार मुंबईतील नवघर पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ३८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धमकीत कथित अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याचे म्हटले आहे.
विशेष म्हणजे ही धमकी मेलवरुन आल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यात कथीत व्हिडिओ व्हायरल करण्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी ५० लाखाची खंडणी मागितल्या आरोपही केला आहे. जुलै महिन्यात विधिमंडळाच्या अधिवेशनात या व्हिडिओ वरुन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृह दणाणून सोडले होते. या व्हिडिओमधील शुटींग सुध्दा त्यांनी पेन ड्राडव्हमधून सभापतींना दिले होते. त्यानंतर सभागृहात याविषयावरुन जोरदार चर्चाही झाली होती.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दिलेल्या पेनड्राईव्हमध्ये आठ तासांचे व्हिडीओ या पेनड्राईव्हमध्ये असल्याचा दावा केला होता. त्यावेळी सोमय्यांनी धमकी देऊन महिलांचे शोषण केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणानंतर किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची सत्यता तपासून, चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातच हे प्रकरण गंभीर आहे. राजकारणात अनेक प्रसंग येतात. मला पुरावे द्या. आम्ही कोणालाही पाठिशी घालणार नाही. याप्रकरणाची सखोल चौकशी होईल. कोणतंही प्रकरण दाबले जाणार नाही असे सांगितले होते.
आता पुन्हा दोन महिन्यानंतर या कथित व्हिडिओची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. याप्रकरणी धमकी देऊन खंडणी मागीतल्याचा आरोप करुन सोमय्या यांनी थेट पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे.
Extortion of 50 lakhs demanded from Kirit Somaiya, threat of making the alleged video viral