इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – एका महिलेची प्रसुती होते. ती बाळाला जन्म देते. परिचारिका, डॉक्टर्स महिलेला व तिच्या कुटुंबाला सांगतात की तुम्हाला मुलगा झाला आहे. सारे आनंदात असतात. थोड्यावेळाने तेच लोक येतात आणि सांगतात की तुम्हाला मुलगी झाली आहे. महिलेचा व कुटुंबाचा रोष मुलगा की मुलगी याबद्दलचा नसून हॉस्पिटलने चुकीची माहिती का दिली, याबद्दल आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयातील हे प्रकरण आता चांगलेच गाजत आहे.
कायदे आणि शिक्षा कठोर करूनही बाळांची चोरी होण्याचे प्रमाण काही कमी झालेले नाही. त्यामुळे कुटुंबियांना वेगळीच शंका येत आहे. वडाळ्यात राहणाऱ्या कुंभार दाम्पत्यासोबत हा प्रकार घडला आहे. सीमादेवी या महिलेची २० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली. त्यानंतर कक्ष परिचरामार्फत मुलगा झाल्याची बातमी कुंभार यांना देण्यात आली. त्यानंतर पुन्हा शस्त्रक्रिया विभागातून आलेल्या परिचारिकेने मुलगी झाल्याचा निरोप दिला. दोन्ही निरोपांमुळे गोंधळलेल्या सुनील यांनी मुलगा की मुलगी ते आधी सांगा, असा आग्रह धरला. त्यानंतर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला. त्यांनी कुटुंबाला समजावण्याचा प्रयत्न केला.
पण आधी चुकीची माहिती देण्यात आली की नंतर, हे आधी स्पष्ट करा, असा आग्रह त्यांनी धरला. मग डीएनए चाचणी करू असे रुग्णालयाने सांगितले. पण आईला आणि नवजात बाळाला घरी जाता येत नसल्याने पतीने २३ सप्टेंबरला पोलीसांत तक्रार दिली. रुग्णालय प्रशासनाने इतका वेळ घेण्याचे कारण काय, हे अद्याप सांगितलेले नाही. त्यामुळे आम्ही पोलिसांना हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे, असे महिलेच्या पतीने म्हटले आहे.
डीएनए चाचणी होणार
रुग्णालय प्रशासनाने न्यायवैद्यक विभागाकडे ‘डीएनए’ चाचणी प्रक्रिया सुरू केली आहे. शुक्रवापर्यंत ती होईल, असे डॉक्टरांच्या वतीने सांगण्यात आले. आधी मुलगा झाल्याचे सांगण्यात आले; परंतु आमच्या हाती मुलगी सोपविण्यात आली, असे सुनील कुंभार यांनी तक्रारीत म्हटले आहे.
The first said son was born, then? The outrageous type in KEM…