इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटना दररोज कानावर येत असतानाच मुंबईत एका नराधाम पित्याने स्वत:च्याच मुलीवर अत्याचार केल्या अतिशय संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत असून संतात व्यक्त होत आहे.
जन्मदात्या वडिलांनीच आपल्या मुलींवर बलात्कार केल्याचा संतापजक प्रकार उघडकीस आला आहे. यातील एक घटना जोगेश्वरी पश्चिम आणि दुसरी घटना बडी मस्जिद परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही नराधम बापांना अटक केली असून त्यांच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिम येथे राहणाऱ्या एका नराधम बापाने जीवे मारण्याची धमकी देत आपल्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार गोवंडी पोलिसांनी वडिलांवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. दुसरीकडे जोगेश्वरीच्या बड्डी मस्जिद परिसरात राहणाऱ्या एका ५२ वर्षीय नराधम बापाने आपल्या ११ वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन केले. मुलगी झोपेत असताना बापाने तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पीडितेच्या आईने पोलिसांत दिली.
संतापाची लाट
ओशिवरा पोलिसांनी ५२ वर्षीय वडिलांवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या दोन्ही मुलीची शासकीय रुग्णालयात वैद्ययिक तपासणी करण्यात आली असून या घटनेचा अधिकचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेने परिसरातून संतापाची लाट उसळली आहे.
A father’s abuse of his own daughter… Mumbai