बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कुलगुरूंची बैठक; नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई होणार

by India Darpan
सप्टेंबर 13, 2023 | 12:27 am
in संमिश्र वार्ता
0
download 2023 09 13T002539.323


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राज्यातील उच्च शिक्षण संस्थांनी नॅक मूल्यांकन करावे, यासाठी उच्चशिक्षण विभागाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अपेक्षित नॅक मूल्यांकन होत नाही. यासाठी विद्यापींठानी पुढाकार घेऊन महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन करून घ्यावे. नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी, असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

मंत्रालयात आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयांच्या नॅक मूल्यांकन संदर्भात कुलगुरूंची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, मुंबई, गडचिरोली, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड या विद्यापींठाचे कुलगुरू उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी विद्यापीठे, महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेणे महत्वाचे आहे. परंतु, काही महाविद्यालयांकडून नॅक मूल्यांकन केले जात नाही. याबाबत संबंधित विद्यापीठांनी नॅक मूल्यांकनासाठी स्थानिक पातळीवर अशा महाविद्यालयांच्या काय अडचणी आहेत, याबाबत पडताळणी करावी आणि नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांची पुढील शैक्षणिक वर्षांपासून प्रवेश प्रक्रिया रोखणे, महाविद्यालयांची संलग्नता रद्द करणे अशी कारवाई सुरू करावी, अशा सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी केल्या.

नॅक मूल्यांकनाच्या प्रक्रियेत बदल करून ही प्रक्रिया सहज, सुलभ व्हावी त्यामुळे ग्रामीण भागातील महाविद्यालय नॅक मूल्यांकनसाठी पुढे येतील, असे बैठकीत कुलगुरू यांनी सांगितले. याबाबत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठवून याबाबत कळविण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
Action will be taken against colleges that do not conduct NAAC assessment

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बॅायफ्रेंण्ड बरोबर इन्स्टाग्रामवर चॅट करतांना सापडली नवविवाहित…मग पुढे असे घडले

Next Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

India Darpan

Next Post
Vichar Dhan

इंडिया दर्पण - विचार धन - वाचा आणि नक्की विचार करा

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011