गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांना दुबईत मिळाला हा पुरस्कार

by India Darpan
ऑक्टोबर 4, 2023 | 1:37 pm
in राष्ट्रीय
0
IMAGE 5

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दुबई -अदील ग्रुप ऑफ सुपरमार्केट्सचे संस्थापक व दूरदर्शी उद्योजक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांना रीटेल उद्योगातील त्यांच्या असाधारण योगदानाबद्दल इंडिया टुडे समूहातर्फे प्रतिष्ठेचा ‘आयकॉन ऑफ दुबई ॲवॉर्ड’ हा पुरस्कार देऊन नुकतेच गौरवण्यात आले. संयुक्त अरब अमिरातीत (युएई) दुबईमध्ये पाम जुमैरा येथील ताज एक्झॉटिका हॉटेलमध्ये झालेल्या शानदार समारंभात ज्येष्ठ राजकीय नेते व मुत्सद्दी डॉ. शशी थरुर यांच्या हस्ते व अनेक नामवंतांच्या उपस्थितीत डॉ. दातार यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला. इंडिया टुडे समूहाचे राजदीप सरदेसाई, नबिला जमील, अंजना ओम कश्यप व श्वेता सिंग यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

अदील ग्रुप ऑफ सुपर मार्केट्सचा ५० हून अधिक रीटेल सुपर मार्केट्स, पिठाच्या गिरण्या व मसाला कारखाने असा विस्तार आहे. आखाती देशात नोकरी-व्यवसायानिमित्त स्थाईक झालेल्या भारतीय समुदायाच्या वैविध्यपूर्ण चवींची पूर्तता करणारी उच्च दर्जाची खाद्य उत्पादने रास्त किंमतीत पुरवण्यात हा समूह महत्त्वाची भूमिका बजावत आला आहे. अस्सल स्वाद व काटेकोर दर्जा निकष राखत अस्सल उत्पादने पुरवण्याची बांधीलकी डॉ. दातार यांनी कायम निभावल्याने त्यांना संयुक्त अरब अमिरातीतील भारतीयांमध्ये प्रेमादराचे स्थान प्राप्त झाले आहे.

आयकॉन ऑफ दुबई हा पुरस्कार केवळ डॉ. दातार यांच्या यशाचाच गौरव नसून त्यातून भारतीय समुदायाच्या खाद्य अनुभवाला समृद्ध बनवण्याप्रती त्यांची कटिबद्धताही अधोरेखित होते. व्यवसायात उत्कृष्टता व समाजसेवेप्रती बांधीलकी जोपासण्यात डॉ. धनंजय दातार करत असलेल्या अखंड परिश्रमांनी रीटेल क्षेत्रात गुणवत्तेचा एक वाखाणण्याजोगा मापदंड स्थापित झाला आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. दातार म्हणाले, आयकॉन ऑफ दुबई पुरस्कार मी नम्रतेने स्वीकारत आहे. दर्जेदार उत्पादने देऊन व भारताचा अस्सल स्वाद राखून आपल्या समुदायाची सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मला मिळालेला हा पुरस्कार एकप्रकारे संपूर्ण अदील परिवाराचे परिश्रम व समर्पितता यांचाच पुरावा आहे.

इंडिया टुडे समूहाने डॉ. दातार यांनी रीटेल उद्योगात बजावलेल्या असाधारण कामगिरीचा केलेला सन्मान हा त्यांची दुबईतील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व ही ओळख अधिक दृढ करणारा आहेच, परंतु त्याबरोबर तो भारतीय समुदायासाठीही अभिमानास्पद आहे.
Masalaking Dr. Dhananjay Datar received this award in Dubai

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिल्लीत प्रा. अभय करंदीकर यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला, अशी आहे त्यांची कारकीर्द

Next Post

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर, यांना मिळाली संधी

India Darpan

Next Post
mantralay 2

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर, यांना मिळाली संधी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011