इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत टोलवरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केल्यानंतर आता त्याच्या प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहे. मराठीतील अभिनेत्री तेजस्विनी पंडितीची एक पोस्ट सध्या त्यामुळे चर्चेत आहे. ही पोस्ट तीने व्टीट केली असून त्यावर आपले मत मांडले आहे.
त्यानंतर मनसेने सुद्दा ही पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, राजसाहेबांनी वाढीव टोलच्या मुद्द्यावर सरकारला सुनावल्यावर, नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस ह्यांनी, मुद्द्याला बगल देण्यासाठी ‘आम्ही राज्यात सत्तेत आल्यापासून सगळ्या टोलवर छोट्या गाडयांना आणि चारचाकी गाडयांना टोलमुक्ती आहे’ अशी थाप मारून टाकली. ह्यावर अभिनेत्री तेजस्विनी पंडित ह्यांनी श्री. देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ शेअर करून, अहो टोलमाफ आहे आणि तरी तो गोळा केला जातोय, मग तो कुणाच्या खिशात जातोय असा सवाल उपस्थित केला आणि राजसाहेबांना ह्या टोलधाडीपासून मुक्त करण्याचं आवाहन केलं आहे. कलाकारांनी वेळेला सरकारला पण जाब विचारला पाहिजे हे राजसाहेबांचं कायमच आवाहन असतं. आज एका कलाकाराने भूमिका घेतली ह्याबद्दल मनापासून अभिनंदन…
ही आहे तेजस्विनीची पोस्ट
म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ???????
ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ??
मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ?
राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा,
महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !!
How can this even be a statement from the “Hon Deputy Chief Minister”
Unbelievable!!
SHARE IF YOU FEEL CHEATED TOO !!!