इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
‘खासगी लहान वाहनांना टोलमाफी आहे’ असं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले ते धादांत खोटं आहे. इथून पुढे महाराष्ट्र सैनिक टोलनाक्यावर उभे राहतील आणि खासगी वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही आणि जर टोलवाल्यांनी बळजबरी केली तर आम्ही टोलनाके जाळून टाकू. टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा घोटाळा असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आज टोलच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री फडणवीस टोलच्या मुद्द्यावरून धांदात खोटं बोलत आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी काल टोलबाबत जे म्हणाले ते खरं आहे का? याला धांदात खोटं असंच म्हणायचं ना? मग हे पैसे जातात कुठे? कुणाकडे जातात? खऱ्या अर्थाने पाहिलं तर टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम आहे. याची शहानिशा झाली पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली.
टोल हा काही काश्मीरचा विषय नाही असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दोन दिवसानंतर मी टोलच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती दिली. ही संपूर्ण पत्रकार परिषद बघा….