मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव शहरातून वाहणा-या मोसम नदीला पूर आलेला असून शहराच्या पुर्व-पश्चिम भागाला जोडणा-या बागा मेहमूद भागातील नागरिकांसह वाहन धारकांना याच पुराच्या पाण्यातून वाट काढत पलिकडे दैनदिन कामासाठी जावे लागत आहे.
त्यामुळे जीव धोक्यात घालून येथील नागरीक या पुलावरुन जात-येत असल्याने तसेच लहान मुले याच पाण्यात खेळत असल्याने महापालिकेने पुलाची उंची वाढवावी अशी मागणी येथील नागरीकांनी केली आहे.
गेल्या वर्षी अशाच पाण्यातून एक दुचाकी स्वार जात असतांना त्याचा तोल जाऊन तो पाण्याच्या प्रवाहात गेल्याने त्याचा मृत्यू झाला होता.
Flooding of Mosam river flowing through Malegaon town