मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे सख्ख्या भावानेच चाकू भोकसून २३ वर्षीय तरुण भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालेगावातील नूरबागमध्ये ही हत्या करण्यात आली. जाविद अहमद मोहम्मद जमील असे मृत तरुणाचे नाव आहे.
संशयित मोठा भाऊ मुद्दसीर अहमद मोहम्मद जमील व मृत जाविद यांच्यात सतत भांडणे होत होती. या वादातूनच मुद्दसीरने जाविदचा खून केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे मालेगावमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. भावानेच भावाने खून केल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले आहे. भावांमध्ये भांडण होणे नवं नाही. पण, त्याचा खून करणे ही गोष्ट अनेकांना संताप देणारी ठरली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी संशयित मुद्दसीरला अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहे.
In Malegaon, brother killed a 23-year-old brother with a knife