मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील द्याने येथील गणेश नगर भागात तीन संशयितांनी कारखानदार संतोष मालपुरे यांच्यावर दिवसा ढवळ्या चॉपरने वार करत बंदुकीचा धाक दाखवत खिशातील मोबाईल व गाडीच्या डिक्कीत ठेवलेले पाच लाख रुपयांच्या रक्कमेसह गाडी पळवून नेली.
यातील एका आरोपीला पडण्यात आले तर दोघे जण गाडी घेऊन फरार झाले. संतोष मालपुरे आपल्या घरुन पैसे घेऊन कामगारांचे पगार करण्यासाठी निघाले होते. मात्र कारखाना परिसरातील गल्ली बोळात मालपुरे यांना तिघांनी गाठत त्यांच्यावर हल्ला करण्यात येऊन रक्कम पळविली. दिवसा ढवळ्या झालेल्या घटनेमुळे यंत्रमाग कारखानदार दहशतीखाली आले आहे.
मालेगावमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी चो-या, मारहाण यासारखे प्रकरा नित्याचेच आहे. त्यात आता कारखानदारावर हल्ला करुन त्यांना मारहाण करणे पैसे लांबवणे ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे दिवसा ढवळ्या हा प्रकार घडला आहे. यातील एका आरोपीला पकडण्यात आल्यामुळे नेमका या घटनेचा उलगडा होणार आहे.
Malegaon attack on loom factory; The car was stolen along with five lakhs