x
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक – महाराष्ट्र ऍथलेटिकस असोसिएशनच्या परवानगीने आणि मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने नाशिकमध्ये दिनांक ४ ते ६ ऑक्टोबर, २०२३ दरम्यान ३७ व्या ज्युनियर आणि युथ गटांच्या महाराष्ट्र राज्य ऍथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची आज यशस्वी सांगता झाली. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून १८०० खेळाडूंनी या स्पर्धेत चांगला प्रतिसाद दिला. यामध्ये १८ वर्षे मुले आणि मुली आणि २० वर्षे मुले आणि मुली या दोन वयोगटांचा समावेश होता. नाशिकच्या मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलाच्या सिथेटिक ट्रॅकवर या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेत धावणे प्रकारात १०० मीटर पासून ते १० हजार मीटर, उडी प्रकारात लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी तर फेक प्रकारात थाळी फेक, गोळा फेक, भाला फेक, हातोडा फेक या प्रकारांचा समावेश होता. या विविध प्रकारात २० वर्षे मुलांच्या गटात दहा हजार मिटर धावणे प्रकारात पुणेच्या गोरख भोसलेने ही धाव ३१. ४१. मिनिटात पूर्ण करून सुवर्णपदक मिळविले. तिहेरी उडीध्ये नाशिकच्या भूषण शिंदे आणि ८०० मिटर रेसमध्ये नाशिकच्या नागेश वसावे यांनी सुंदर कामगिरी करून प्रथम क्रमांक मिळविले.
४०० मीटर धावणे प्रकारात ठाणेच्या निखील ढाके याने हे रेस ४८.७ सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले. ११० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत सांगलीच्या अभिजित भोसलेने १६. ७० सेकंदात रेस पूर्ण करून पहिला क्रमांक मिळावीला. थाळी फेक प्रकारात सांगलीच्याच अभिजित भोसलेने ३२. ८१ मीटर थाळी फेकून सुवर्ण पडलं मिळविले. ४०० मीटर मीटर अडथळ्याच्या शर्यतीतकोल्हापूरच्या अविनाश कदमने हे आंतर ५४. ८८ सेकंदात पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळविला १८ वर्षे मुलांच्या गटात ३००० मीटर लांब पेल्याच्या धावणे प्रकारात कोल्हापूरच्या हर्षद कदमने ९. ०३. ५४ मिनिटात रहे अंतर पूर्ण करून पहिला क्रमांक मिळविला. ४०० मीटर धावणे प्रकारात मुंबई उपनगरच्या क्रिश सिंगने ही रेस ५०. सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले.
भालाफेक प्रकारात नाशिकच्या राहुल धोत्रे याने सर्वात जास्त लांब ५७. ३५ मीटर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले. १०० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत सांगलीच्या कान्हया गोसावीने हे रेस १६. ८७ सेकंदात पूर्ण करून पहिला क्रमांक मिळविला. १०० मीटर धावणे प्रकारात मुंबई उपनगरच्या जेन्सन कॅस्टेलिनो याने सर्वात वेगवान धाव घेत हे अंतर १०. ५५ सेकंदात पूर्ण करून सुवर्ण पदक मिळविले.
मुलींमध्ये १८ वर्षे गटात ५००० मीटर या लांब पल्ल्याच्या धावणे प्रकारात सांगलीच्या भाग्यश्री हडपेने हे अंतर २९. १०. ७२ मिनिटात पूर्ण करून सुवर्णपदक मिळविले. तर ३००० मीटर धावणे प्रकारात नागपूरच्या भाग्यश्री महालेने हे अंतर १०. ४०. २२ मिनिटात पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळविला. तिहेरी उडी प्रकारात साताराच्या रेवा तांडेलने हे अंतर १०. ६५ मिनिटात पूर्ण करून पहिला क्रमांक मिळविला. भालाफेक प्रकारात पुणेच्या ईश्वरी महालेने सर्वात जास्त ३६. ३० मीटर अंतर भाला फेकून प्रथम क्रमांक मिळविला.
मुलींच्या २० वर्षे गटात गोळा फेक प्रकारात मुंबई शहर ची खेळाडू हंसिका वासू हीने सर्वात जास्त ११. ५२ मीटर गोळा फेकून प्रथम क्रमांक मिळविला. ४०० मीटर धावणे प्रकारात साताराच्या अनुष्का कुंभाराने हे अंतर ५५. ८४ सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदल मिळविले. १०० मीटर धावणे प्रकारात नागपूरच्या नागेश्वरी वद्दापल्ली हीने सर्वात कमी वेगाने १२. ७७ सेकंदात ही रेस पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळविला तिहेरी उडी प्रकारात साताराच्या प्राची देवकर हीने सर्वात लांब १.. १५. ४० मीटर उडी घेत सुवर्णपदक मिळविले.
या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची निवड महाराष्ट्राच्या संघासाठी करण्यात आली आहे. या सर्व खेळाडूंचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार असून त्यांनतर हे निवड झालेले खेळाडू दिनांक ७ ते १- नोव्हेंबर दरम्यान कोईमतूर येथे आयोजित राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील अशी माहिती महाराष्ट्र ऍथलेटिकस असोसिएशनचे सरचिटणीस सतीश उच्चील, नाशिक जिल्हा ऍथलेटिकस असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे, सचिव सुनील तावरगिरी यांनी दिली. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन व्हावे यासाठी महाराष्ट्र ऍथलेटिकस असोसिएशनचे आणि नाशिक जिल्हा ऍथलेटिकस असोसिएशनचे प्रशिक्षक पंच, कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.
स्पर्धाच निकाल :-
१८ वर्षे मुले :-
८०० मीटर -१)नागेश वसावे,नाशिक प्रथम, २) साईनाथ पिंगटे, गडचिरोली, दुसरा क्रमांक ३)अविनाश पाटील,धुळे,तिसरा क्रमांक.
तिहेरी उडी – १) भूषण शिंदे,नाशिक,प्रथम २) अभिषेक शर्मा, कोल्हापूर- दुसरा क्रमांक, ३) आर्यन जांभूले, नागपूर – तिसरा क्रमांक.
३००० मीटर धावणे – १) हर्षद कदम, कोल्हापूर- प्रथम, लालू गांगड,नाशिक – नाशिक, ३) सचिन भराड,पुणे – तिसरा क्रमांक.
२० वर्षे मुले :-
३००० मीटर धावणे : १) हर्षल कदम, कोल्हापूर – प्रथम, २)लालू गांगड, नाशिक दुसरा क्रमांक, ३) सचिन भराड, पुणे – तिसरा क्रमांक
४०० मीटर धावणे : १) कृष्ण सिंग, मुंबई उप,व३) नगर – प्रथम, २)अंकित राजे, ठाणे – दुसरा क्रमांक, ३) धृवकुमार सिंग,पालघर – तिसरा क्रमांक
४०० मीटर अडथळा शर्यत : १) संदीप गोंड, पुणे – प्रथम, २)आदिनाथ विभुते, नांदेड – दुसरा क्रमांक, ३)गौरव सांगळे,पालघर – तिसरा क्रमांक
१०० मीटर अडथळा शर्यत : १)कान्हया गोसावी,सांगली – प्रथम, २)विनायक राजे, पुणे – दुसरा क्रमांक, ३) सार्थक सारडे,पुणे – तिसरा क्रमांक
१०० मीटर धावणे : १) जेन्सन कॅस्टेलिनो, मुंबई उपनगर – प्रथम, २)ओम इट्टलवार, नागपूर – दुसरा क्रमांक, ३) माधव धारक,पुणे – तिसरा क्रमांक
महिला – १८ वर्षे –
५००० मीटर – १) भाग्यश्री हडपले, sangli- प्रथम, २) चेतना मधामी, गडचिरोली – दुसरा क्रमांक, ३) संजना पाटील, पुणे – तिसरा क्रमांक.
३००० मीटर – १) भाग्यश्री महाले, नागपूर- प्रथम, २) साक्षी भंडारी, अहमद नगर – दुसरा क्रमांक, ३) मानसी यादव,पुणे – तिसरा क्रमांक.
२० वर्षे
गोळा फेक – १) हंसिका वासू – प्रथम. २) रजनंदिनी सोनवणे, सातारा – दुसरा क्रमांक, ३) किरण नायर,पुणे – तिसरा क्रमांक.
तिहेरी उडी – १) प्राची देवकर, सातारा – प्रथम, २) सृष्टी रेडेकर, कोल्हापूर – दुसरा क्रमांक, ३) अर्चना जाधव, मुंबई उपनगर – तिसरा क्रमांक.
४०० मीटर धावणे – १) अनुष्का कुंभार, सातारा – प्रथम, २) रमा पाटील कोल्हापूर – दुसरा क्रमांक, ३) साक्षी फुलसुंदर, पुणे – तिसरा क्रमांक.
१०० मिटर धावणे – १) नागेश्र्वरी वद्दपल्ली,नागपूर – प्रथम, २) श्रेया हेगडे, पुणे – दुसरा क्रमांक, ३) श्वेता माळवे सातारा – तिसरा क्रमांक.
1800 players participated in the Maharashtra State Field Championship in Nashik, the players of this district dominated the field, see the full report