इंडिया दर्पण ऑनलाईन
ऑक्टोंबर महिना सुरु झाल्यामुळे सर्वांच्या नजरा आता आता परतीच्या पावसाकडे लागल्या आहे. हवामान खात्याने १० ऑक्टोबरनंतर मुंबईतून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. तर ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ् माणिकराव खुळे यांनी महाराष्ट्रातून गुरुवार ५ ऑक्टोबरला मान्सून परत फिरण्यास सुरवात होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे. राज्यात पुढील काही दिवस अजूनही पावसाचा अंदाज कायम आहे. एकुणच पाऊस या पंधरवाड्यापुरताच असेल असा अंदाज आहे.
सध्या पडणारा पाऊस हा रब्बी हंगामातील दुसऱ्या आवर्तनाचा पाऊस समजावा असेही खुळे यांनी सांगितले आहे. राज्यात मध्यतंरी पावासाने ओढ घेतली. त्यानंतर पुन्हा पावसाचे जोरदार आगमन झाले. असे असले तरी राज्यातील नऊ जिल्ह्यात पावसाची तुट कायम आहे. राज्यातील पालघर, मुंबई उपनगर, ठाणे आणि नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
हवामान खात्याने राज्यात एकूण सरासरीच्या ९७ टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती दिली आहे. पुढील काही दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. त्यामुळे पावसाचे काही दिवस आगमन होईल त्यानंतर परतीच्या पावसाला सुरुवात होईल.
Now all eyes are on the return of rain in Maharashtra;