इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या तीन गरजा आहेत, त्यापैकी निवारा हा आयुष्यातून साधारणतः एकदाच उभारला जातो, वस्त्र देखील साधारणतः वर्षभरातून एक दोनदा घेतले जाते, मात्र अन्न हे रोजच लागत असते, कोणी कोणते अन्न खावे ? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असून मानवी हक्क आणि अधिकारानुसार आपापल्या चाली परंपरा रीतीनुसार मानवी समाज अन्नग्रहण करतो, यामध्ये काही जण शाकाहारी तर काहीजण मांसाहारी आहेत. मात्र शाकाहार योग्य की मासांहार या संदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. मुंबई शहरात अलीकडच्या काळात शाकाहार मांसाहारावर वरून अनेकदा वादांग उठले आहेत, आता पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटले आहे. कारण शाकाहारींसाठी राखीव जागांवर मांसाहार करणाऱ्याला मुंबईत आयआयटीमधील विद्यार्थ्यांला दहा हजारांचा दंड ठेठावला आहे.
हा निर्णय भेदभाव करणारा
गेल्या काही दिवसांपूर्वी आयआयटी मुंबईतील मेस (भोजनालय ) तथा खानावळीत मांसाहारास बंदी असल्याच्या आशयाचे फलक लावल्यामुळे संस्थेच्या आवारात वादंग झाले होते. शाकाहारींसाठी राखीव असलेल्या जागी बसून मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांला आयआयटी मुंबईत दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पुढील सत्राच्या प्रवेश शुल्कामधून हा दंड वसूल करणार असल्याचे विद्यार्थ्यांला ई- मेलद्वारे कळविण्यात आले आहे. त्यामुळे आयआयटी मुंबई पुन्हा एकदा नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
फलकावर आक्षेप
विद्यार्थी संघटनांनी फलकावर आक्षेप घेतला. अखेर प्रशासनाने असा कोणताही नियम नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी १२, १३ व १४ क्रमांकाच्या वसतिगृहाच्या खानावळीतील सहा टेबल शाकाहारी विद्यार्थ्यांसाठीच राखीव ठेवण्यात आल्याची सूचना मेस तथा खानावळीच्या समन्वय समितीने दिली. या निर्णयाबाबत विद्यार्थ्यांना ई- मेलद्वारे कळविण्यात आले होते. त्यानंतर एका विद्यार्थ्यांने खानावळी समन्वय समिती आणि अधिष्ठातांना मेल करून हा निर्णय चुकीचा व भेदभाव करणारा असल्याचे सांगितले. मात्र आता या प्रकरणाला पुढे काय वळण मिळते याची उलट सुलट चर्चा सुरू आहे.
Mumbai IIT again in controversy… Student fined 10 thousand for this reason…