इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंढरपूर : ‘आषाढी कार्तिकी भक्तजन येति । चंद्रभागेमाजी स्नाने जे करीती । दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती । केशवासी नामदेव भावे ओवाळीती ।।… ‘हिंदू पंचांगानुसार वर्षभरात २४ एकादशी असतात. यात आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या मोठ्या एकादशी मानल्या जातात. त्यात देखील दोन महाएकादशी मानल्या जातात. यातील पहिली आषाढी एकादशी आणि दुसरी कार्तिकी एकादशी. कार्तिकी एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी म्हणतात. या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून पंढरपुरात आषाढी व कार्तिकी एकादशीच्या दिवशी महापूजा करण्याची परंपरा आहे. शिवरायांच्या काळात हा मान महाराजांचा होता. त्यानंतर हा मान सातारच्या छत्रपतींकडे आला. ब्रिटीशांच्या काळात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ही पूजा करत होते. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर हा मान मुख्यमंत्र्यांकडे आला. सध्या युत्या-आघाड्यांचा काळ असल्यामुळे आता आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, तर कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा केली जाते. उपमुख्यमंत्री नसेल तर मुख्यमंत्र्यानंतरच्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या हस्ते म्हणजेच महसूल मंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा केले जाते. परंतु आता एक उपमुख्यमंत्र्याऐवजी राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे यंदा कार्तिकी एकादशीला पंढरपूरची महापूजा कोणता उपमुख्यमंत्री करणार या संदर्भात चर्चा सुरू झाली आहे मात्र हा पेच देवस्थानच्या बैठकीनंतर सुटणार असल्याचे सांगण्यात येते.
१९७३ पासून विठालाची शासकीय पूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांना दिला जातो. यापूर्वीच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजेचा मान चुकवलेला नाही. पुर्वी राज्यामध्ये युतीचे सरकार आले होते. तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि विठ्ठलपूजेच्या सोहळ्यात थोडे बदल झाले. आषाढीची पूजा मुख्यमंत्र्यांनी करायची आणि कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायची, ही पद्धत याच काळात सुरू झाली. त्यानंतर च्या मंत्रिमंडळांमध्ये उपमुख्यमंत्री हे पद नसताना मुख्यमंत्र्यानंतरच्या क्रमांक दोनच्या मंत्र्याला हा मान देण्यात येत होता मात्र आता दोन उपमुख्यमंत्री असल्याने यंदा हा मान कोणाला मिळतो यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.
येत्या २३ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहे. या दिवशीची पहाटे २:२० वाजता होणारी विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक केली जाणार आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यापैकी कोणाला बोलवायचे, याबाबत विधी व न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून निर्णय घेणार असल्याचे श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
Who will perform Mahapuja of Vitthal on Kartiki Ekadashi?