इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात TRAI ने नुकत्याच जारी केलेल्या अहवालानुसार जूलै २०२३ मध्ये रिलायन्स जिओने महाराष्ट्रामध्ये ६.२९ लाख ग्राहकांना आपल्या नेटवर्कमध्ये जोडले आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या एअरटेल ने नाममात्र ६८ हजार नवीण ग्राहकांची भर घातली. रिलायन्स जिओ ४१.५३ दशलक्ष ग्राहकांसह महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे.
देशातील दिग्गज कंपनी व्होडा आयडिया म्हणजेच Vi ने जूलै महिन्यात पुन्हा एकदा तोटा सहन करावा लागला असून १.३६ लाख ग्राहकांनी व्होडा आयडियाचे नेटवर्क सोडले आहे. बीएसएनएलने मात्र २२ हजार नवीन ग्राहकांची भर घातली आहे. सुमारे २३.५४ दशलक्ष वापरकर्त्यांसह व्ही बाजारात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारती एअरटेल २१.२८ दशलक्ष यूजर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
वायरलेस सब्सक्राइबर अर्थात महाराष्ट्रातील कस्टमर मार्केट शेअर मध्ये सुद्धा जीओ अव्वल असून रिलायन्स जिओ ४६.२५ टक्के ग्राहकांसह पहिल्या स्थानावर आहे. भारती एअरटेल २५.६२ सह दुसऱ्या आणि व्होडाआयडिया २३.९५ टक्के मार्केट शेअरसह तिसऱ्या स्थानावर आहेत. बीएसएनएल १.६८ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
सलग तीन महिन्यात रिलायन्स जीओ ने ग्राहकांची भर घातली असून जिओच्या 5G सेवेला सुद्धा ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे . नुकत्याच ओपन सिग्नल या संस्थने केलेल्या पाहणीनुसार भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्टेडियम मध्ये जीओचा डाउनलोड स्पीड एअरटेलच्या दुप्पट तर व्होडा आयडिया पेक्षा तिप्पट असून जीओची 5G ऊपलब्धता ही २.६ पट जास्त आहे