इंडिया दर्पण वृत्तसेवा
मुंबई – महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित, मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालक पदावर ब्रिजेश दीक्षित, निवृत्त भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवा (IRSE) यांची दोन वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला असून मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार राज्य शासनामार्फत ही नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची स्थापना मे २०२३ रोजीच्या शासन आदेशान्वये करण्यात आली असून या आदेशान्वये महामंडळाच्या संचालक मंडळाची रचना विहित केली आहे.
श्री.दीक्षित यांना मेट्रो रेल नागपूर, पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प, रेल्वे तसेच रस्ते महामार्ग, पूल, व्हायाडक्टस आणि भुयार मार्ग बांधणी या पायाभूत विकास प्रकल्पांच्या कामांचा अनुभव आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी पाच एशिया बुक ऑफ रेकॉर्ड प्राप्त असून मॉडर्न मेट्रो मॅन ऑफ महाराष्ट्र पुरस्कार २०२२ सह अन्य विविध महत्त्वपूर्ण पुरस्काराने श्री.दीक्षित यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.
The state government entrusted Brijesh Dixit with this big responsibility…