इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –
आंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये सर्वाधिक मानाचा समजला जाणारा ‘बॅलन् डी’ओर’ हा सर्वोच्च व्यक्तिगत पुरस्कार पुन्हा एकदा अर्जेन्टिनाच्या लिओनेल मेस्सीलाच मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार हा पुरस्कार लिओनेल मेस्सी यालाच मिळणार असल्याबाबतची माहिती संबंधितांनी मेस्सीला आधीच दिली असल्याचे मेस्सीचा मित्र ॲलसँड्रो डोसेटी याने दिली आहे.
२०२२ च्या विश्वचषक स्पर्धेत मेस्सीने दमदार कामगिरी करून ७ गोल आणि ३ गोल सहकार्य केले होते. या कामगिरीच्या आधारावरच अर्जेंटिनाने २०२३ चा विश्वचषक जिंकून इतिहास निर्माण केला होता. कतारमध्ये झालेल्या या स्पर्धेनंतर मेस्सीने पॅरिस सेंट जर्मन आणि इंटर मिआमी या दोन्ही क्लब कडून आपली दर्जेदार कामगिरी सुरूच ठेवली आहे.
चॅम्पियन्स लीग आणि प्रीमियर लीग या सारख्या क्लब स्पर्धांमध्ये त्याने दर्जेदार खेळ केलेला असल्यामुळे येत्या ३० ऑक्टोबर रोजी जाहीर होणाऱ्या बॅलन डी’ओर पुरस्काराच्या शर्यतीत तो एर्लिंग हालंड आणि फ्रान्सच्या कायलिन एमबाप्पे यांना सहज मागे टाकू शकतो. अर्थात, हे वृत्त खात्रीलायक नसले तरी, ते खरे ठरल्यास सर्वाधिक ८ वेळेस हा पुरस्कार जिंकण्याचा विक्रम लिओनील मेस्सीच्या नावासमोर नव्याने नोंदविण्यात येईल हे नक्की.
This year’s Ballon d’Or award will be given to Lionel Messi…?