नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टेक्नो या तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्य व स्टाइलसाठी ओळखल्या जाणाऱ्या आघाडीच्या ब्रँडने परत एकदा आकर्षक डिझाइनसह स्मार्टफोन लाँच करत नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. टेक्नो स्पार्क १० प्रो मून एक्सप्लोरर एडिशन लाँच करत ब्रँडने डिझाइन, उपयुक्तता आणि पर्यावरणीय जबाबदारीच्या बाबतीतल्या मर्यादा ओलांडण्याची बांधिलकी नव्याने दाखवून दिली आहे. हा स्मार्टफोन भारताची चंद्र मोहीम – चांद्रयान ३ पासून प्रेरणा घेत बनवण्यात आला असून त्यात पर्यावरणपूरक इको सिलिकॉन लेदर अनोख्या ब्लॅक अँड व्हाइट लेदर डिझाइनमध्ये देण्यात आले आहे.
आयुष्यातले महत्त्वाचे क्षण तपशीलवारपणे कैद करण्यासाठी टेक्नो स्पार्क १० प्रो मून एक्सप्लोरर एडिशनमध्ये अल्ट्रा- क्लियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात ३२ एमपीचा एआय सेल्फी कॅमेरा व सेल्फीजसाठी ड्युएल फ्लॅश आणि मागच्या बाजूस ५० एमपी ड्युएल कॅमेरा एफ१.६ अर्पाचर व ड्युएल फ्लॅश देण्यात आला असून त्यामुळे जबरदस्त फोटोग्राफी करता येते.
टेक्नो स्पार्क १० प्रो मून एक्सप्लोरर एडिशन ११,९९९ रुपये किंमतीत बनवण्यात आले आहे. ८ जीबी + ८ जीबी रॅम कॉन्फिगरेशन व १२८ जीबीचे इंटर्नल स्टोअरेज असून स्मार्टफोन प्रेमींना त्यानिमित्तान स्टाइल व नाविन्य यांचा मेळ घालणारा फोन अनुभवता येणार आहे
टेक्नो स्पार्क १० प्रो मून एक्सप्लोरर एडिशनच्या लाँचविषयी टेक्नो मोबाइलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिजीत तलापात्रा म्हणाले, नाविन्य व सौंदर्य यांचा अनोखा मिलाफ साधणारी टेक्नो स्पार्क १० प्रो मून एक्सप्लोरर एडिशन लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे. टेक्नो स्पार्क १० प्रो मून एक्सप्लोरर एडिशन आपले नाविन्यपूर्ण डिझाइन, लक्षणीय कॅमेरा, दमदार कामगिरी आणि ११,९९९ रुपये किंमतीच्या मदतीने स्मार्टफोन बाजारपेठेत क्रांती घडवेल असा विश्वास वाटतो.
टेक्नो स्पार्क १० प्रो मून एक्सप्लोरर एडिशन आपले नाविन्यपूर्ण डिझाइन, लक्षणीय कॅमेरा, दमदार कामगिरी आणि आकर्षक किंमतीच्या मदतीने स्मार्टफोन बाजारपेठेत क्रांती घडवण्यासाठी सज्ज आहे. तयार व्हा, स्टाइल, नाविन्य आणि पर्यावरण जागरूकतेच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी.
The leading brand launched this smartphone with an attractive design