जिल्हाधिका-यांनी रुग्ण आणि नातेवाईकांची घेतली भेट
लातूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील तावरजा कॉलनीत फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेंडरचा रविवारी स्फोट होऊन यात फुगे विक्रेता ठार झाला असून ११ लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. जखमींवर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. ही घटना समजताच जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी रविवारी रात्री रुग्णालयात जाऊन रुग्ण आणि नातेवाईकांची भेट घेतली. जखमींवर योग्य त्या उपचाराबाबत डॉक्टरांना सूचना दिल्या.
घडलेली घटना अत्यंत दुर्देवी असून जखमींवर डॉक्टर सर्वतोपरी इलाज करत आहेत. डॉक्टरांच्या टीमने तात्काळ उपचार सुरु केल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. घटना घडल्यानंतर पोलिसांनीही ताबडतोब घटनास्थळी जावून जखमी बालकांना ताबडतोब रुग्णालयात दाखल केले.पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनीही फोनकरून रुग्णांच्या तब्येतीची माहिती जाणून घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस घटनेची चौकशी करीत असून अशा दुर्दैवी घटना यापुढे घडू नयेत, यासाठी चौकशी अहवालानंतर जिल्हा प्रशासन निर्णय घेईल, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.
२ मुलांची प्रकृती गंभीर
यात्रा किंवा जत्रेमध्ये फुगेवाले आपल्याला दिसून येतात, त्यांच्याजवळ एक मोठे लांब व दंडगोलाकार सिलेंडर असते, नळीच्या साह्याने ते फुग्यामध्ये हवा भरतात. त्यांच्याजवळ रंगीबेरंगी फुगे घेण्यासाठी बालकांची गर्दी दिसून येते, सध्या सण उत्सवाचे दिवस सुरू आहेत. त्यातच लातूर शहरात एका फुगेवाल्याकडे असलेल्या सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात तो स्वतःच ठार झाला असून त्याच्याजवळ फुगे घेण्यासाठी आलेली १२ बालके देखील जखमी झाले आहेत. त्यापैकी २ मुलांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
गर्दीच्या ठिकाणी घडली दुर्घटना
लातूर शहरातील तावरचा कॉलनीतील इस्लामपुरा भागात ही दुर्घटन घटना घडली. जखमींपैकी एक मुलगी ७० टक्के भाजल्याने तिची प्रकृती चिंताजनक बनली आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामधील वाघाळा (राडी ) येथील रहिवासी रामा इंगळे (वय ५०) हा फुगेवाला रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास लातूर शहरात लुनावर लांब सिलेंडर ठेवून फुगे विकत होता त्याच्याभोवती पंधरा-वीस मुलांची फुगे घेण्यासाठी गर्दी झाली होती. त्याच वेळी अचानक फुग्यामध्ये गॅस भरताना. यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झाला त्यात फुगेवाला जागीच ठार झाला आहे. त्यातील ११ मुले जखमी झाली असून या लहान मुलांना रुग्णालयात दाखल केले आहे.
मुलांचे वय ३ ते १२ च्या दरम्यान
त्या सर्व लहान मुलांचे वय ३ ते १२ च्या दरम्यान आहे. त्यापैकी एका पाच वर्षाच्या मुलीला ७० टक्के भाजले आहे. बाकी मुलांपैकी एका मुलाचा हात मोडला आहे. बाकी सर्व मुले मात्र धोक्याबाहेर आहेत.या घटनेत दुर्घटनेत लुनाचे झाले तुकडे तुकडे झाले आहे. जखमी बालकांना लातूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.