इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तरप्रदेशमध्ये चार वर्षाच्या दोन मुलांचे अपहरण करुन त्यांना ऊसाच्या शेतात गोणीत टाकून फेकून दिल्याची घटना समोर आली आहे.
मंगळवारी सकाळी १० वाजता लखीमपूरच्या उचौलिया येथील एघारा गावात ही घटना घडली. ही लहानमुले गावातील अंगणवाडी केंद्रातून घरी जात असतांना त्यांचे अपहरण करण्यात आले.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, ही दोन्ही मुले घरी आली नाही म्हणून कुटुंबियांना शोध सुरु केला. पण, त्यांना ते कोठेच मिळाले नाही. अखेर त्यांना ऊसाच्या शेतात आवाज आला. त्यानंतर त्यांना पडलेली एक गोणी दिसली ती उघडल्यानंतर एक मुलगा त्यात होता. तर दुसरा मुलगा काही अतंरावर बसलेला होता.
गावातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पिता – पुत्राने हे अपहरण केल्याचे समोर आले आहे. या दोघांनी मोटारसायकल वर बसून या मुलांना नेले .त्यानंतर गोणी टाकून त्यांना उसाच्या शेतात फेकले. मुलांनी त्यांचे नाव सांगितल्यानंतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी राकेश आणि त्याचा मुलगा नरवीर हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मुलांना विकण्यासाठी पळवून नेले जात होते. मुलांच्या बचावाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे
Shocking event! Kidnapping of 4 year olds…Sacked and thrown in sugarcane fields..