इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – खामगावात गजानन महाराज अवतरल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्याबाबच्या विविध पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यात. मात्र, आता हे गजानन महाराज कोण याबाबतचे सत्य पुढे आले आहे. रविवारपासून गजानन महाराजांच्या वेशात आलेल्या व्यक्तीची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
बुलढाण्यातील अशोक सातव यांच्या घरी ती व्यक्ती अचानक गजानन महाराजांच्या वेशात येऊन बसला होता. या बाबाला पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. आता हा बाबा नेमका कोण आहे ? त्याबाबत माहिती समोर आली आहे. शेषराव बिराजदार असे या बाबाचे नाव आहे. बाबाने शासनाच्या निराधार योजनेचा लाभ घेतलाय.
या बाबाजवळ ओळखपत्र सापडलं असून तो लातूरचा असल्याचे समजले आहे. एका वृत्तवाहिनीने या बाबाची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत बाबाने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. शेगावातल्या आनंदसागरमध्ये माझी गादी आहे. येथे मी लोकांची सेवा करतो. कुलकर्णी या ब्राम्हणाने मला सांभाळलले, असे या बाबाने सांगितले आहे. आनंदसागरमध्ये गादी असून सामान्य माणसांत फिरून मी त्यांना गजानन महाराजांविषयी सांगतोय, असे या बाबाचे म्हणणे आहे.
आमदाराचे नाव आले पुढे
आतापर्यंत अनेक आमदारांनी माझी भेट घेतली आहे. माझी सेवा केली आहे, असे म्हणत बाबाने आमदार बबनराव लोणीकर यांचे नाव घेतले. गजानन महाराज माझ्यामध्ये येतात आणि संचारतात, असे हे बाबा वारंवार सांगतात. यावर विश्वास कसा ठेवायचा असे विचारल्यावर मात्र बाबाला समाधानकारक उत्तर देता आलेले नाही. गजानन महाराजांचे रूप घेऊन बसलेला बाबा काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या डीवायडरवर देखील बसला होता. बाबाच्या अशा कृ्त्याने आतापर्यंत लोकांचा त्याने मारही खाल्ला आहे. या बाबाने स्वत: मला महाराष्ट्रातील लोकांनी मारहाण केली असे म्हटले आहे.
It is revealed that the person who came in the guise of Gajanan Maharaj from Khamgaon turned out to be true