इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : वैद्यकीय क्षेत्रात नवीनवीन आविष्कार होत असतानाच तितक्याच नवनवीन स्वरूपातील आजारांचे प्रमाण वाढले आहे. वेगवेगळ्या स्वरूपातील आजारांनी संपूर्ण जग हादरले आहे. या पार्श्वभूमीवर केनियातील एका शाळेत एकाचवेळी ९० विद्यार्थिनींना अर्धांगवायूचा झटका आला आहे.
पॅरॅलिसिस ही एक अशी परिस्थिती आहे की, ज्यामध्ये शरीरातील काही अवयव किंवा अर्ध्या भागाच्या हालचाली बंद होतात. त्यामुळे व्यक्तीच्या नैसर्गिक हालचालींवर मर्यादा येतात. अर्धांगवायू, लकवा, पक्षाघात ही एकाच आजाराची वेगवेगळी नावे आहेत. तुमच्या आजूबाजूला किंवा कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये ही समस्या उदभवल्याचे तुम्ही ऐकले किंवा पाहिले असेल. दरम्यान, आता समोर आलेली घटना हादरवणारी आहे. कारण- एका शाळेत एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल ९० शाळकरी मुलींना अर्धांगवायूचा झटका झाला. हा आकडा ऐकून डॉक्टरही चक्रावले आहेत.
तुमचाही यावर विश्वास बसत नाही ना? मात्र, समोर आलेला व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल. सोशल मीडियावर या मुलींचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि हे प्रकरण समोर आले आहे. ही संपूर्ण घटना केनिया देशातील एका शाळेतील आहे. येथील काकामेगा काउंटी येथील महाविद्यालयातील ९० विद्यार्थिनींसोबत काहीतरी विचित्र घटना घडली. सेंट थेरेमा एरगी महाविद्यालयातील या विद्यार्थिनी मागील काही आठवड्यांपासून रुग्णालयात दाखल आहेत. एका भयंकर आजारामुळे त्यांच्या शरीरातील कंबरेखालच्या भागाला अर्धांगवायूचा झटका आल्यासारखे दिसत आहे.
रक्त, लघवीचे नमुने तपासणीसाठी
मुलींना चालण्यास त्रास होत होता आणि गुडघेदुखीची लक्षणे वाटते होती. हे सगळे अचानक घडल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. अचानक या मुलींच्या पायांतील ताकदच निघून गेली आहे. अचानक अशी परिस्थिती का उदभवली याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, आतापर्यंत मुलींच्या रक्त व लघवीचे नमुने प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले आहेत. तसेच, शाळेतच असे काही घडले आहे का, याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या संदर्भातील एका व्हिडिओमध्ये विद्यार्थिनी हॉस्पिटलच्या बेडवर अक्षरश: थरथर कापताना दिसत आहेत.
Paralysis of 90 female students at the same time? The video went viral