नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयआयटी कानपूरचे माजी संचालक प्राध्यापक अभय करंदीकर यांनी डॉ.राजेश गोखले यांच्याकडून विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे नवे सचिव म्हणून पदभार स्वीकारला. प्रा.करंदीकर हे इलेक्ट्रिकल इंजीनियर असून देशाच्या दूरसंचार क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानासाठी ते प्रसिद्ध आहेत.
त्यांनी किफायतशीर ग्रामीण ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी सक्षम करण्यासाठी कमी खर्चिक “Frugal 5G नेटवर्क” संकल्पना विकसित केली आणि दूरसंचार धोरण आणि नियमांमध्ये योगदान दिले ज्याचा समावेश राष्ट्रीय दूरसंचार धोरणांमध्ये करण्यात आला.
आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी असलेले प्रा. करंदीकर यांनी मुंबई आयआयटी मधून आपली कारकीर्द सुरू केली जिथे ते नंतर डीन (फॅकल्टी अफेयर्स) बनले आणि त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागाचे प्रमुख, आयआयटी बॉम्बे रिसर्च पार्कचे पहिले प्रोफेसर-इन -चार्ज आणि मुंबई आयआयटी संगणक केंद्राचे प्रमुख बनले.यानंतर आयआयटी कानपूरच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली, जिथून त्यांनी शिक्षण घेतले होते.
प्रा.करंदीकर यांनी त्यांनी आणि त्यांच्या गटाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानासाठी विविध पेटंट दाखल करण्यासाठी देखील नेतृत्व केले.
Prof. Karandikar takes charge as Secretary DST