नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १३ दिवसापासून बंद असलेले कांदा लिलाव आज जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरु झाले. काल व्यापा-यांनी आपला संप मागे घेतल्यानंतर आज हे लिलाव सुरु झाले. शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीला आणल्याचे चित्र सर्वच बाजार समितीत होते.
आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत सकाळी लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याला जास्तीस जास्त २५०० तर सरासरी २००० हजार रुपयांच्या पुढे दर मिळाला सकाळच्या सत्रात जवळपास ५०० वाहनां मधून आवक झाली.
संप सुरु झाल्यानंतर १३ दिवसापासून दिवस कांदा चाळीत असल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा निवडून बाजारात विक्रीला आणला. भाव कमी मिळाला तरी तो विकण्या शिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. गेल्या १३ दिवसापासून लिलाव बंद असल्यामुळे कोटयवधींची उलाढाल थांबली होती. पण, आता ती पुन्हा सुरु झाली आहे.