इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे : महाराष्ट्राच्या अनेक घराण्याचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाला केवळ यात्रा – उत्सवात नव्हे तर वर्षभर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची नेहमीच गर्दी असते. त्यातच अनेकदा काही बरे वाईट प्रसंग देखील घडतात. एका कुटुंबातील आजी आणि नातीवर असाच एक भयानक प्रसंग ओढवला, त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न एका मध्यमवयीन इसमाने केला. परंतु त्यातून या दोघींनी सुखरूप सुटका करून घेतली. खंडोबा गडावर दर्शन घेऊन कडेपठारच्या डोंगरात दर्शनासाठी भरदुपारी निघालेल्या एका आजी (वय ६०) व नातीला( वय-१३) जवळच्या वाटेने देवाला जाऊ असे सांगून एका नराधमाने गोड बोलून दरीतील जानाई मंदिराजवळ नेले, त्यात आणखी एक गोष्ट म्हणजे हे ठिकाण खोल दरीत असल्याने त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न सुरु केला, मात्र या दोघींनी त्याला मोठा प्रतिकार केल्याने आरोपी पळून गेला. यावेळी मुलीने त्याला एक दगड फेकून मारल्याने त्याच्या कपाळातून रक्त आले. तो जखमी आवश्यक तसाच त्या डोंगरावरून खाली पसार झाला. त्यानंतर रात्री पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे.
दर्शनासाठी येणाऱ्या महिला सुरक्षित नाहीत
सध्या सण उत्सवाचे दिवस असल्याने अनेक धर्मक्षेत्र आणि तीर्थस्थळाच्या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येते, परंतु महिला एकटी किंवा केवळ महिलाच एकत्र असल्याने त्यांच्यासोबत पुरुष नसल्यास त्याचा गैरफायदा घेणारे नराधम लोकही समाजात वावरत असतात, अशा नीच प्रवृत्तीच्या माणसांचा महिला तरुणी इतकेच नव्हे तर वृद्ध महिलांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागतो. दोघीजणी म्हणजे नात आणि खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी गडावर आल्या होत्या, दर्शन झाल्यावर त्या डोंगरातील वाटेने कडेपठारकडे निघाल्या, वाटेत त्यांना सुमारे ४५ वयाचा एक इसम भेटला, तुम्हाला जुन्या गडावर जाण्याचा जवळचा रस्ता दाखवतो असे म्हणत त्याने बरोबर येण्यास सांगितले, त्याचेवर विश्वास बसल्याने दोघी जणी त्याच्याबरोबर डोंगरातील एका खोल दरीत उतरल्या, तेथे असणाऱ्या जानाई देवीच्या मंदिरामध्ये दर्शन घेतले.
हा परिसर निर्मनुष्य असल्याने संधी साधून त्याने या अल्पवयीन मुलीची छेडछाड सुरू केली, मुलगी ओरडू लागल्याने आजी प्रतिकार करण्यासाठी पुढे आली. तेव्हा त्याने आजीला लाथा बुक्क्याने मारहाण करीत ढकलून दिले, अल्पवयीन मुलीशी तो गैरवर्तन करू लागला, यावेळी तिने प्रसंगवधान राखून एक दगड जोरात त्याला मारला दगड कपाळाला लागून रक्त आल्यानंतर तो पळाला. हा प्रकार घडल्यानंतर दोघीजणी घाबरलेल्या अवस्थेत कडेपठार मंदिराजवळ आल्या व त्यांनी घडलेला प्रकार तेथील तरुणांच्या कानावर घातला. यानंतर त्यांनी जेजुरीतील खासगी दवाखान्यात जाऊन उपचार करून घेतले व गावाकडे निघून गेल्या. त्यामुळे धार्मिक स्थळे किंवा देव दर्शनासाठी येणाऱ्या महिलाही सुरक्षित नाही अशी चर्चा सुरू आहे.
जेजुरी गड परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची मागणी
मोठया हिमतीने आपल्यावर भेटलेल्या प्रसंगावर आजी आणि नातीने मात केली. एकमेकांना धीर देत त्या आपल्या घरी आल्या. घरच्या परिवारातील लोकांना घडलेला प्रकार सांगितल्यावर त्यांनी जेजुरीत येऊन पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली. विभागीय पोलीस अधिकारी यांनी जेजुरी पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाची माहिती घेतली. जेजुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खंडोबा मंदिराच्या परिसरात हा प्रकार घडल्याने जेजुरीत खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील नराधम हा ४० ते ५० अशा मध्यम वयाचा असून डोक्यावर टक्कल पडलेले आहे अंगात आकाशी रंगाचा फुल शर्ट काळी पॅन्ट घातलेला,हातात तंबाखूचा बटवा असे त्याचे वर्णन आहे पोलिसांनी त्याचे स्केच बनवण्याचे काम हाती घेतले आहे. असायचं अशा वर्णनाची संपूर्ण लागल्यास ताबडतोब पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले तसेच जेजुरी गड परिसरात आणखी सुरक्षा वाढविण्याची मागणी होत आहे.