जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा आरक्षणासाठी गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. आहेत. शरीरातील पाणी पातळी कमी होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावले आहे. मात्र, तरीही ते आपल्या निर्धारावर ठाम आहेत. कोणत्याही परिस्थितीत उपोषण सोडायचं नाही असा निर्धारच त्यांनी केला आहे. जरांगे यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक गावात तळ ठोकून आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज उपोषणस्थळी जाऊन जरांगे यांची विचारपूस केली.
मंगळवारी मंत्र्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषणावर ठाम राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर अध्यादेश काढण्यासाठी आपण सरकारला चार दिवसांची मुदत देत आहोत. तोपर्यंत आपण उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला.
पण, पहाटे जरांगे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना सलाईन लावली आहे. दरम्यान त्यांच्या प्रकृती खालावल्याची वार्ता पसरल्याने जालना, औरंगाबादसह आजपासच्या जिल्ह्यातून मराठा कार्यकर्ते अंतरवाली सराटीकडे यायला निघाले आहेत. त्यामुळे आज अंतरवाली सराटी येथे आंदोलकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जरांगे यांची प्रकृती खालावल्याने मराठा कार्यकर्त्यांना टेन्शन आले आहे. सरकारने जरांगे पाटील यांना वाचवावे. आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढावा, असे आवाहनही मराठा आंदोलकांनी केले आहे.
Manoj Jarange, who was on hunger strike, deteriorated