जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जळगावात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले.यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्ला केला. यावेळे ते म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल हे नुसते नावाचे पोलादी पुरुष नव्हते. तर कामाचे पोलादी पुरुष होते. पण आज कोणीही उठतो आणि स्वत:ला पोलादी पुरुष म्हणून घेतो. पण काम करून उभं राहणारे काही तुरळक लोक आहेत. त्यापैकी पटेल एक आहेत. त्यांचा पुतळा पालिकेच्या आवारात उभारला हे महत्त्वाचं आहे, असे म्हणाले.
यावेळी त्यांनी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीवरून भाजपवर जोरदार टीका केली. सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाच्या विरोधात फौजा घुसवल्या आणि मराठवाडा महाराष्ट्रात समील करून घेतला होता. आज आपण त्यांचे पुतळे उभारतोय. कारण ते खरे पोलादी पुरुष होते. वल्लभभाईंनी मराठवाड्यात जशी कारवाी केली. तशी मणिपूरममध्ये कारवाई करायची यांची हिंमत होत नाही. हे स्वत:ला पोलादी पुरुष म्हणून घेत आहेत. हे कसले पोलादी पुरूष ? हे तर तकलादू पुरूष आहेत. यांच्या कारभाराचा सोक्षमोक्ष लावायचा आहे असेही त्यांनी सांगितले.
जळगावची ही सभा लाईव्ह बघा
Uddhav Thackeray’s meeting in Jalgaon