इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगाव जिल्ह्यात धरणगाव तालुक्यात मतदार यादीचे काम करताना जिल्हा परिषदेच्या खरदे येथील प्राथमिक शाळेतील शिक्षकाचा मृत्यू झाला. रवींद्र रतिलाल बोरसे असे मृत शिक्षकाचे नाव आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, रवींद्र रतीलाल बोरसे प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खर्दे बु. ता. धरणगाव हे त्यांच्या नियुक्तीच्या शाळेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) पदाचे मतदान केंद्र सुसूत्रीकरण विषयक कामकाज करीत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
तातडीने उपचारासाठी त्यांना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल केले असता, त्यांची प्राणज्योत मालविल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
त्यांच्या निधनाने जिल्हा निवडणूक अधिकारी व निवडणूक संबंधित जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
Death of a teacher while working on voter list… Incident in Jalgaon district…