इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगाव – पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने रेल्वे खाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रावेर तालुक्यात एका रिक्षा अपघातात पत्नीचा अपघात झाला. त्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना गुरुवारी रात्री मृत्यू तिचा मृत्यू झाला. या घटनेचा पतीला मोठा धक्का बसला. आपल्या पत्नीचा विरह सहन न झाल्यामुळे पतीने नशिराबाद परिसरातील रेल्वे रुळावर जाऊन आत्महत्या केली. पण, या घटनेमुळे या दांम्पत्यांची चार मुले मात्र पोरकी झाली. आहेत. या घटनेची नोंद नशिराबाद पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.
या घटनेत राजू सोमसिंग राठोड (वय ३५) हे आत्महत्या करणा-या पतीचे नाव आहे. तर अपघातात मृत झालेल्या पत्नीचे संगीता राजू राठोड (वय ३०) आहे. हे दोघेही बऱ्हाणपूर येथील बोदर्डी गावचे असून ते रावेर तालुक्यातील जिनसी येथे राहत होते. राजू राठोड हा गेल्या काही दिवसापासून जळगाव शहरात कामानिमित्त नातेवाईकांकडे आलेला होता. तर पत्नी संगीता राठोड या मुलांकडे रावेर येथेच होत्या.
गुरुवारी पत्नी संगीता राठोड यांचा अपघात झाला. त्यांना उपचारासाठी नातेवाईकांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. पण, तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. पत्नीची मृत्यूची घटना कळताच पती राजू राठोडला मोठा धक्का बसला. त्याने विरहात नशिराबाद जवळ रेल्वे खाली आत्महत्या केली. शुक्रवारी हा मृतदेह मिळाला. चौकशी नंतर आत्महत्याची घटना समोर आली.
Unable to bear the loss of his wife, the husband commits suicide under the train.