जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : येथील भरवस्तीत असलेल्या एका हॅाटेलमध्ये सुरू असलेल्या वेशाव्यसायावर धाड टाकत पोलिसांनी ५ महिलांसह ४ पुरुषांना ताब्यात घेतले आहे. जिल्हापेठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळजनक उडाली आहे.
भजे गल्ली परिसरात चोपडा मार्केट येथील एका हॅाटेलवर जिल्हापेठ पोलिसांनी मंगळवारी १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यावेळेस ५ महिलांसह ४ पुरुषांना ताब्यात घेण्यात आले. या वेशाव्यवसायाची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाल्यानंतर अगोदर पथक तयार करण्यात आले. त्यानंतर पोलिस बनावट ग्राहक बनून पंटरव्दारे आत गेले. त्या ठिकाणी ५ महिला व काही पुरुष असल्याचे आढळले.
ही कारवाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मीरा देशमुख, सलीम तडवी, रवींद्र साबळे, तुषार पाटील, जयेश मोरे, महिला कॉन्स्टेबल मनीषा बिरारी आणि कल्पना मोटे यांनी केली आहे.
Prostitution in hotels located in Jalgaon