इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगाव – राजमल लाखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड व मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतरांच्या बँक फसवणूक प्रकरणात ईडीकडून ३१५ कोटींच्या ७० स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती ईडीने आपल्या ट्वीटरवरून दिली आहे.
सीबीआयने काही महिन्यापूर्वी गुन्हे दाखल केले होते. त्या आधारावर ईडीकडून मनीलाँड्रीग प्रकरणी तपास सुरू होता. या तपासात मनी लाँड्रींग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही जप्तीची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीने जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील ७० स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त केल्या आहेत. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी पीएमएलए, २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे.
राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आरएल गोल्ड व मनराज ज्वेलर्स आणि त्यांचे प्रवर्तक ईश्वरलाल शंकरलाल जैन, मनीष ईश्वरलाल जैन यांच्यासह कुटुंबियांच्या या मालमत्तेत समावेश आहे.
ED action against these jewelers of Jalgaon; 70 properties worth 316 crore seized