इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगाव: शहरात काही वर्षांपूर्वी गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते मात्र अलीकडच्या काळात जळगाव हे शांतता प्रिय शहर म्हणून ओळखले जाऊ लागले होते, परंतु आता पुन्हा एकदा या शहरात गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे असे दिसून येते. एका तरुणाने एक मुलगी अल्पवयीन ( वय १३ ) असताना पासून गेल्या पाच वर्षांपासून सतत वारंवार तिच्यासोबत असलेली कृत्य केले इतकेच नव्हे, तर त्या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ चित्रण करून तिला धमकी देत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. अखेर हे प्रकरण उघड झाले असून याप्रकरणी त्या विकृत तरुणास अटक करण्यात आली आहे.
नातेवाईकांना बसला मोठा धक्का
जळगाव शहरात एमआयडीसीची मोठी वसाहत आहे या एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात १८ वर्षीय तरुणी कुटुंबासह राहते. सदर तरुणी अल्पवयीन असताना म्हणजे १३ वर्षाची असताना पासून सन २०१९ पासून रामेश्वर कॉलनीमध्ये राहणारा दानीश तडवी या विकृत मनोवृतीच्या तरुणाने ओळखीचा फायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर दानीशने या तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेवून सुरूवातीला अश्लिल कृत्य केले. त्याचे फोटो आणि व्हिडीओदेखील बनविले. त्यानंतर पुन्हा मागील वर्षी मेहरुण परिसरात एका ठिकाणी तिला नेऊन फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा त्रास देणे सुरूच होते. सुरुवातीला तिने हा प्रकार कोणाला सांगितला नाही, हा त्रास असह्य झाल्याने हा त्रास सहन न झाल्याने पीडीत तरुणीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. तेव्हा सर्वांनाच धक्का बसला
विकृत तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार करीत तिला वारंवार त्रास देणाऱ्या दानीश तडवी या तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला एमआयडीसी पोलिसांनी रामेश्वर कॉलनी परिसरातून अटक केली आहे. दरम्यान, तरुणीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच या तरुणाला बेडया ठोकल्यानंतर आता या प्रकरणाची आणखी सखोल चौकशी करण्यात येत आहे.
jalgaon City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten