इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बैलगाडीवरुन पडल्याने जळगाव जिल्ह्यातील कला शिक्षकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संदीप नरोत्तम महाजन (४५) असे कलाशिक्षकाचे नाव आहे. ते शेतातील कामासाठी बैलगाडी घेऊन जात असताना ही घटना घडली. बैल अचानक त्यांच्या वाड्याकडे घुसल्याने ते बैलगाडी वरुन पडले.
या घटनेत त्यांच्या डोक्यालाजबर मार लागला. त्यांच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यानंतर कुटुंबियांना त्यांना जळगाव येथील सामान्य रुग्णालय दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषीत केले. कला शिक्षकांचा असा अंत झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी सकाळी ७ ते ८ वाजे दरम्यान शेतातील कामासाठी बैलगाडी घेऊन जात असताना ही घटना घडली.
संदीप महाजन हे जळगाव तालुक्यातील सुनसगाव येथील दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते नशिराबाद येथे राहत होते. ते एक उत्कृष्ट चित्रकार होते त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ होता. त्यामुळे ते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. त्यांच्या वडिलांचे नुकतेच चार महिन्यांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुले असा परिवार आहे.
Unfortunate death of an art teacher of Jalgaon after falling from a bullock cart