इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात इस्त्रो एकामागोमाग एक मोहीम राबवित आहे. अवघ्या जगाला आश्चर्याचा धक्का देत इस्त्रोने चंद्रापाठोपाठ सूर्याची वारी केली. त्यानंतर आता इस्त्रोने शुक्राची वारी करण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रो आता शुक्र मोहिमेसाठी सज्ज झाले आहे. इस्रोकडून आता शुक्रयान मोहिमेच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे.
शुक्र ग्रहावरील वातावरण आणि त्यांच्या प्रभाव यांचा अभ्यास करण्यासाठी ही मोहिम राबवण्यात येणार आहे. शुक्र ग्रहावरील वातावरणाबाबत संशोधनासाठी इस्रो तेथे एक मोहिम राबवणार आहे. शुक्र ग्रहाचे वातावरण आणि तेथील आम्लीय वायूंबाबत समजून घेण्यासाठी एक मोहिम हाती घेतली जाणार आहे. राष्ट्रीय विज्ञान अकादमी मध्ये व्याख्यान देताना इस्रो प्रमुख सोमनाथ यांनी शुक्रयान मिशनबाबत माहिती दिली. जर आपण शुक्र आणि मंगळ ग्रहांवर जीवन का नाही. या ग्रहांबाबत अधिक खोलवर समजून घेण्यासाठी तिथे मोहिम पाठवणं आवश्यक आहे.
इस्रो प्रमुखांच्या या वक्तव्याच्या काही महिन्यांपूर्वी इस्रोच्या एका शास्त्रज्ञाने शुक्रयान मोहिमेला विलंब होऊ शकतो, असा दावा केला होता. इस्रोकडून शुक्रयान मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, शासनाकडून शुक्रयान मोहिमेसाठी अद्याप अधिकृत परवानगी मिळालेली नाही, अशी माहिती समोर येत आहे.
सूर्यमालेच्या उत्पत्तीबाबत माहिती मिळणार
शुक्र ग्रहाभोवती ढगांचा थर जमा झाला आहे. त्यामध्ये आम्ल भरलेले असते. त्यामुळे कोणतेही अंतराळयान किंवा वाहन आम्लीय ढगांचे वातावरण ओलांडून शुक्र ग्रहाच्या पृष्ठभागावर पोहोचू शकत नाही. सूर्यमालेच्या उत्पत्तीबद्दल माहिती मिळविण्यासाठी शुक्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे.