इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवविवाहित पत्नी इन्स्टाग्रामवर प्रियकरासोबत चॅट करताना पकडली गेल्यानंतर पतीला चांगलाचा धक्का बसला आहे. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच ही नवविवाहीत आपल्या प्रियकराबरोबर सोशल मीडियातून चॅट करत असतांना पतीने बघितले. त्यानंतर नवऱ्याने त्यावर पत्नीला जाब विचारला. पण, पत्नीने चॅट करणा-याला मित्राला बोलावून पतीलाच गप्प केले. या घटनेनंतर या नवविवाहिताला नवऱ्याशिवाय कुटुंबियातील सदस्यांनी खूप समजावण्याचा प्रयत्न करत होते. पण, प्रेमात बुडालेल्या या नवविवाहितावर काहीच फरक पडला नाही. ती चॅट करतच राहिली.
हे प्रकरण वाढल्यावर पत्नीने आई-वडिलांच्या घरातून काही लोकांना बोलावून पतीसह अनेकांना मारहाण केली. आता या प्रकरणी पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी पत्नीच्या माहेरच्या कुटुंबाविरुद्ध मारहाणीचा एफआयआर दाखल केला आहे, तर पत्नीच्या कुटुंबीयांनी पती आणि सासरच्यांविरुद्ध घरगुती छळाचा गुन्हा दाखल केला आहे. आता पोलीस दोन्ही बाजूंच्या आरोपांचा तपास करत आहेत.
उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील माझोला पोलीस स्टेशन परिसरात मुलाच्या बाजूने त्याच्या पत्नीसह पाच जणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने आरोप केला आहे की, पतीने सुनेला तिच्या प्रियकरासोबत इन्स्टाग्रामवर चॅट करताना पकडले होते. यानंतर संतापलेल्या पत्नीने आई-वडिलांना बोलावून सासरच्या मंडळींना बेदम मारहाण केली. त्याचवेळी तिने हुंड्याचा आरोप करत अमरोहा देहत पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध एफआयआरही दाखल केला.
The newlywed was found chatting with her boyfriend on Instagram.