इंडिया दर्पण डेस्क
सोमवारी पाकीस्तानवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर आज भारत आणि श्रीलंका संघ आशिया चषकात पहिल्याच आमनेसामने आले आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. काल ज्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान मध्ये सामना झाला त्याच मैदानावर हा सामना रंगणार आहे.
भारत -पाकिस्तान सामन्यात पावसाने व्यत्यत आणला होता. त्यामुळे या सामन्यात पावसाने हजेरी लावली तर पुन्हा प्रेक्षकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कोलंबोमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे खेळपट्टी आणि मैदानावर काय परिणाम झाला हे सुध्दा या सामन्यात महत्त्वाचे आहे.
आशिया चषकात भारत आणि श्रीलंका संघ पहिल्यांदाच आमनेसामने असणार आहे. सुपर ४ लढतीत भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. तर श्रीलंका संघाने बांगलादेशला मात दिली होती. दोन्ही संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे हा सामना रंगतदार होणार आहे.
या सामन्यात तीन फिरकी गोलंदाजासह मैदानात भारतीय संघ उतरला असून शार्दूल ठाकूर याला आराम देण्यात आला आहे. कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा यांच्या जोडीला अक्षर पटेल याला स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघात इतर कोणताही बदल करण्यात आला नाही. दुसरीकडे श्रीलंका संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ कायम ठेवण्यात आला आहे.
First India-Sri Lanka encounter, India won the toss, batting first